स्थानिक

बारामतीत उद्यापासून कडक निर्बंध !सकाळी नऊ ते संध्याकाळी सात ची वेळ, पहा काय बंद आणि काय सुरु

सर्व मेडिकल, हॉस्पिटल यासह इतर अत्यावश्यक सेवा 24 तास चालू राहतील

बारामतीत उद्यापासून कडक निर्बंध !सकाळी नऊ ते संध्याकाळी सात ची वेळ, पहा काय बंद आणि काय सुरु

सर्व मेडिकल, हॉस्पिटल यासह इतर अत्यावश्यक सेवा 24 तास चालू राहतील

बारामती वार्तापत्र

बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची रोज संख्या वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रशासनाने बारामतीत कडक निर्बंधाची घोषणा केली आहे.

आजही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 89 झाली आहे मागील दोन दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांनी शंभरी गाठली होती. नागरिक विनाकारण काही ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोना निर्बंधाचे पालन होत नाही.

प्रथम उपविभागीय अधिकारी कांबळे यांनी कोरोना नियंत्रित करण्यासाठी करण्यात येणा-या विविध उपाययोजनांवर सर्व यंत्रणाशी चर्चा केली. त्यानंतर ते म्हणाले की, बारामती शहरासह ग्रामीण भागात मागील काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुभाव नियंत्रीत करण्यासाठी बैठकीत झालेल्या निर्णयानुसार उद्यापासून बारामती शहरातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व आस्थापना व दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत चालू राहतील. मात्र हॉटेलची पार्सल सेवा सायंकाळी सात पासून रात्री दहापर्यंत चालू राहील, असा निर्णय प्रशासनाने या बैठकीत घेतला. बारामती शहरातील सूर्यनगरी, गणेश मंडई व ग्रामीण भागातील माळेगाव ब्रु., पणदरे, गुणवडी ही कोरोनाची हॉट स्पॉट ठिकाणे आहेत. त्या ठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करुन सर्वेक्षण व टेस्टींग तात्काळ करण्यात यावे, तसेच जिल्हाधिकारी यांनी पारित केलेल्या SOP प्रमाणे 50% कर्मचा-यांच्या उपस्थित आस्थापना चालवण्यात यावी, SOP चे प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावे तसेच जे नियम पाळत नाहीत त्यांची आस्थापना /दुकाने सिल करण्याची कारवाई करण्यात येईल अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांनी कोव्हिड विषयचे आदेश, नियम व SOP नुसार कारवाई करावी असे, आदेशही त्यांनी दिले.

सूर्यनगरी पूर्णतः प्रतिबंधित क्षेत्र म्हणून प्रशासनाने घोषित केले आहे.

सर्व आस्थापनाचे मालक व चालक यांनी प्रशासनास सहकार्य करावे, त्यांच्या आस्थापनेत/दुकानात सॅनिटायझर ठेवावे, No Mask No Entry असा बोर्ड लावण्यात यावा, संबंधित आस्थापनाचे मालक/चालक व त्यामधील सर्व कर्मचारी यांनी कायमस्वरुपी मास्काचा वापर करावा, सामाजिक अंतराबाबच्या नियमांचे पालन करावे, ग्राहक नोंदी साठी स्वतंत्र नोंदवही ठेवून ग्राहकांचे नाव व मोबाईल क्रमांक व स्वाक्षरी घेण्यात यावी, प्रवेशद्वाराजवळ ऑक्सीमीटर, थर्मल स्कॅनिंग गनचा वापर करावा, संपूर्ण आस्थापना वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे, स्वच्छतागृहात हात धुण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी यावेळी दिले

शासन व प्रशासन यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिंस्टसिंग व शासनाच्या सूचनांचे पालन करावे असे, आवाहनही यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले.

या बैठकीसाठी आज प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, उपनगराध्यक्ष अभिजित जाधव,मुख्याधिकारी किरण राज यादव, नगर परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गटनेते सचिन सातव, वैद्यकीय अधीक्षक सदानंद काळे यांच्यासह व्यापारी महासंघातर्फे जगदीश पंजाबी , सुरेंद्र मुथा , सचिन सातव, सुभाष सोमाणी , राहुल वाघोलीकर, प्रवीण आहुजा, शैलेश साळुंके, सचिन बुधकर, चेतन दोशी, स्वप्निल मुथा व इतर आणि मर्चंट असोसिएशन चे अध्यक्ष महावीर वडुजकार सर्व पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!