बारामतीत उद्या अजित पावरांच्या घरासमोर का वाजणार ढोल ? वाचा सविस्तर.
निवासस्थाना समोर मराठा क्रांती मोर्चा कडून ढोल बजाओ आंदोलन केले जाणार आहे.
बारामतीत उद्या अजित पावरांच्या घरासमोर का वाजणार ढोल ? वाचा सविस्तर.
बारामती वार्तापत्र
गेल्या सात ते आठ दिवसांपासून राज्यातील राजकारण मराठा अरक्षणावरून चांगलंच तापल्याच पाहायला मिळत आहे.सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्या नंतर राज्यातील मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला आहे.पुन्हा एकदा मराठा अरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे.त्याच पार्श्वभूमीवर आता मराठा क्रांती मोर्चा कडून राज्यातील सर्वपक्षीय नेते आणि मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन केली जात आहेत.त्याच अनुषंगाने उद्या शनिवार (दि.२६) रोजी बारामतीत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आमदार असलेल्या अजित पावरांच्या ‘सहयोग सोसायटी’ या निवासस्थाना समोर मराठा क्रांती मोर्चा कडून ढोल बजाओ आंदोलन केले जाणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे दर शनिवारी आणि रविवारी बारामती दौऱ्यावर असतात.त्यामुळे उद्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात येणाऱ्या ढोल बजाओ आंदोलनाला एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे.त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी प्रमाणे बारामती दौऱ्यावर येणार का ? आणि मराठा क्रांती मोर्चा च्या आंदोलनाची गंभीर्याने दखल घेणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, मराठा अरक्षणावरून राज्यातील राजकारण तापलं असतानाच रोज विरोधकांकडून राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरत राज्य सरकारच्या भूमिके विषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.त्यामुळेच उद्या बारामतीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात येणाऱ्या ढोल बजाओ आंदोलनाची राज्य सरकार म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार दखल घेऊन त्यांना ठोस आश्वासन देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.