बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन
केंद्र सरकारसह आयकर विभागाचा केला निषेध व्यक्त

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन
केंद्र सरकारसह आयकर विभागाचा केला निषेध व्यक्त
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात आयकर विभागाने छापेमारी सुरू केल्याने उपमुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ बारामती शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बारामती शहरातील भिगवण चौक याठिकाणी शनिवारी (दि.९) आंदोलन करण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तियांवर सलग दोन दिवस छापेमारी सुरू होती. काही ठिकाणी अद्यापही छापेमारीचे सत्र सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या समर्थनार्थ बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले.
यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी देखील सुरू होती ‘अजित दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ ‘हमारा नेता कैसा हो अजित दादा जैसा हो’ अशा जोरदार घोषणा देखील देण्यात आल्या.तसेच we support ajit dada’ अशा प्रकारचे बॅनर देखील दिसून आले,मात्र यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा ताळमेळ कुठेही दिसून आला नाही.
यामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या विविध चार ते पाच गटांकडून वेगवेगळ्या प्रकारे घोषणाबाजी केली जात होती, यामुळे हे नक्की समर्थन होते ? की फक्त निव्वळ बॅनरबाजी होती असा प्रश्न बारामतीकरांना पडलेला आहे ? या मोजक्याच कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे मात्र बारामतीमध्ये वाहतुकीची तब्बल अर्धा तास कोंडी झाली.