बारामतीत उभारणार ‘ कॅन्सर ‘ हॉस्पिटल – उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार
टाटा ट्रस्टच्यावतीने 35 एकरात होणार बांधकाम
बारामतीत उभारणार ‘ कॅन्सर ‘ हॉस्पिटल – उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार
टाटा ट्रस्टच्यावतीने 35 एकरात होणार बांधकाम
बारामती वार्तापत्र
बारामतीत सर्व सोयींनी युक्त असे कॅन्सरच्या हॉस्पिटल उभारण्याची घोषणा उपमुख्यमंत्रीअजितदादा पवार यांनी केली. बारामती शिक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण झाली असून आता ती आरोग्य क्षेत्रातही स्वयंपूर्ण होत आहे. नागरिकांचे कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील ठराविक दोन-तीन कॅन्सर हॉस्पिटल वगळता इतर ठिकाणी उपचाराची सोय नव्हती.बारामती परिसरातील रुग्णांना पुणे किंवा बार्शी या ठिकाणी कॅन्सरवर उपचार करण्यासाठी जावे लागत आहे .त्यामुळे चंद्रपूरच्या धर्तीवर हे कॅन्सरचे हॉस्पिटल बारामतीत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी टाटा ट्रस्ट च्या वतीने ज्याप्रमाणे वाराणसी, मुंबई या ठिकाणी हॉस्पिटल उभारले आहेत त्या पद्धतीने बारामतीतही सहकार्य घेण्यात येणार आहे.हे हॉस्पिटल सुमारे 35 एकरामध्ये उभे राहणार असून कॅन्सरशी संबंधित वेगवेगळ्या सेवा व तपासण्या याठिकाणी होणार आहेत . त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादी सत्तेत नव्हती त्यावेळी बारामतीचा विकास थांबला की काय अशी परिस्थिती झाली होती. मात्र गेल्यावर्षी महा विकास आघाडीची सत्ता आल्यामुळे अजित दादा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद आल्यामुळे बारामतीच्या विकासात सुरुवात झाली आहे. पुण्याप्रमाणे बारामतीत शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जात आहे. आरोग्याच्या बाबतीतही सिल्वर जुबली हॉस्पिटल, महिला हॉस्पिटल, वेगवेगळ्या हॉस्पिटलच्या माध्यमातून सामान्य रुग्णांची उपचार करण्यात येत आहे .आणि आता कॅन्सरच्या रुग्णांवर हे बारामतीतच उपचार होणार असल्याने तसेच बारामती तालुक्यातील काऱ्हाटीच्या कृषी मूल शिक्षण संस्थेसाठी निधी देऊन तेथील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे