स्थानिक
बारामतीत एन्व्हॉर्यमेंटल फोरमचा वसुंधरा पुरस्कार नेहा पंचमियाला प्रदान….
बारामती आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले.

बारामतीत एन्व्हॉर्यमेंटल फोरमचा वसुंधरा पुरस्कार नेहा पंचमियाला प्रदान….
बारामती आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले.
बारामती वार्तापत्र
एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून येत्या काळात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी दिली.
फोरमच्या बाराव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून वन्यजीव बचाव क्षेत्रात कार्य करणा-या पुण्याच्या नेहा पंचमिया यांना यंदाचा वसुंधरा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्मृतीचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. या प्रसंगी आयोजित समारंभात सुनेत्रा पवार बोलत होत्या.
विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अँड. ए.व्ही. प्रभुणे, सचिव अँड. नीलीमा गुजर, विश्वस्त किरण गुजर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, वनपरिक्षेत्र अधिकारी अनिता पाटील, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, रचना पाटील, राज देशमुख आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
या प्रसंगी बारामतीचा नावलौकीक उंचावणा-या आर्या तावरे, कपिल जाचक, डॉ. अजिनाथ खरात, श्रुती कांबळे, समीर बनकर व पणदरे ग्रामविकास मंच यांना बारामती आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले. आर्याच्या वतीने तिचे वडील कल्याण तावरे, डॉ. खरात यांच्या वतीने राजू आहेरकर व तर पणदरे ग्रामविकास मंचच्या वतीने डॉ. विक्रम जगताप यांनी पुरस्कार स्विकारले.
गेल्या बारा वर्षात एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या वतीने पर्यावरण, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, विज्ञान या क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा आढावा सुनेत्रा पवार यांनी प्रास्ताविकात घेत आगामी काळात फोरमच्या वतीने विविध उपक्रम आयोजित केले जाणार असल्याचे नमूद केले.
अँड. ए.व्ही. प्रभुणे यांनी मनोगतात फोरमच्या कामाची प्रशंसा करत बारा वर्षात बारामतीसाठी फोरमने महत्वाची भूमिका बजावल्याचे नमूद केले. या प्रसंगी अनिता पाटील व रचना पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. नेहा पंचमिया यांनी सत्काराला उत्तर देताना पुरस्काराबद्दल बोलताना वन्यजीव बचाव क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कपिल जाचक, कल्याण तावरे, राजू आहेरकर, डॉ. विक्रम जगताप यांनीही या प्रसंगी मनोगत व्यक्त केले.