बारामतीत काका पुतण्यांच्या प्रचाराचा वेग,मामाविरोधात भावाच्या प्रचारासाठी ‘रेवती सुळे’ मैदानात ; कोण मारणार बाजी ?
निवडणुकीत अजित पवार यांची चांगलीच कसोटी लागली

बारामतीत काका पुतण्यांच्या प्रचाराचा वेग,मामाविरोधात बहीण ‘रेवती सुळे’ भावासाठी गल्ल्या गल्ल्यांमध्ये प्रचारासाठी मैदानात
निवडणुकीत अजित पवार यांची चांगलीच कसोटी लागली
बारामती वार्तापत्र
पूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी काका-पुतण्यामध्ये लढाई होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने यूगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आता या काका पुतण्यांच्या प्रचाराचा वेग मतदारसंघात चांगलाच वाढला आहे. यातच खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे या युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत.
पक्षफुटीनंतर पहिल्यांदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना मोठा धक्का बसला. पत्नी सुनेत्रा पवार यांचा खासदार सुप्रिया सुळे यांनी पराभव केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांची चांगलीच कसोटी लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून बारामती मतदारसंघातील राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलं आहे. यातच अजित पवार यांच्याकडून थेट शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं जात आहे. त्यावर शरद पवार देखील त्यांना प्रत्युत्तर देत आहे. त्यामुळे या लढतीकडे आता संपूर्ण राजाचं लक्ष लागून राहिले आहे.
अजित पवार यांच्यासाठी पत्नी सुनेत्रा पवार तसेच जय पवार, पार्थ पवार हे प्रचार करताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूला युगेंद्र पवार यांच्यासाठी अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार हेही मैदानात उतरले आहे. यासह सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हे देखील घरोघरी जाऊन युगेंद्र पवार यांचा प्रचार करताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान युगेंद्र पवारांनी रेवती पवार यांनी एकत्रितपणे सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता. आता भावासाठी बहीण बारामतीच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये प्रचार करताना दिसत आहे.
युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी रोहित पवारही मैदानात
विशेष म्हणजे रेवती सुळे आणि प्रतिभा पवार यांच्याआधी शरद पवारांचे नातू तथा कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीदेखील काल युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी बारामती तालुक्याचा दौरा केला होता. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही चुरशीची होणार आहे. युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी रोहित पवार काल प्रचारासाठी मैदानात उतरलेले बघायला मिळाले. रोहित पवार यांनी काल बारामती तालुक्यातील ग्रामीण भागाचा दौरा केला होता.
“बारामती ही शरद पवारांचीच आहे हे लोकसभेला दाखवून दिले आहे. बारामती आजही शरद पवारांची आहे आणि उद्याही त्यांचीच राहील. आम्ही २३ तारखेला बारामतीत तुतारीचाच गुलाल उधळू. आम्ही आहोत त्याच ठिकाणी आहोत. आम्ही काय महायुतीसोबत गेलो नाहीत. जमेची बाजू आमची ही आहे की शरद पवार आमच्यासोबत आहेत. बारामतीत परिवर्तन झालेल आपल्याला पहायल मिळेल. पुन्हा एकदा लोकसभा लागली की काय अस वातावरण पाहायल मिळतंय”, असं रोहित पवार म्हणाले आहेत.