बारामतीत काल घेतलेल्या नमुन्यांपैकी एकुण ८१ जण पाॅझिटीव्ह.
एकूण बरे झालेले रुग्ण- 1143
बारामती वार्तापत्र
कालचे (14/09/20) एकूण rt-pcr नमुने 166. एकूण पॉझिटिव्ह- 22. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. कालचे एकूण एंटीजन 206. एकूण पॉझिटिव्ह-59 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 22 + 59=81. शहर- 47 ग्रामीण- 34 एकूण रूग्णसंख्या-2194 एकूण बरे झालेले रुग्ण- 1143 एकूण मृत्यू– 56.
बारामतीमध्ये काल तपासणी झालेल्या कोरोनाबाधितांमध्ये ५२ जण माळेगाव, पणदरे व गुनवडी गावातील सिरो सर्वेक्षणात आढळले आहेत.या ५२ जणांमुळे बारामती तालुक्यात काल दिवसभरात 52+81 = 133 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. या व्यतिरिक्त इतर खासगी प्रयोगशाळांमध्येही कोरोनाग्रस्तांचे नमुने तपासले आहेत.
शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये भिगवण रोड येथील ४८ वर्षीय महिला, साईगणेश नगर येथील ५१ वर्षीय महिला, माळेगाव येथील १९ वर्षीय मुलगी, वाणेवाडी येथील ६५ वर्षीय पुरूष, सिध्दार्थनगर येथील ६५ वर्षीय पुरूष, मळद रोड येथील ३३ वर्षीय पुरूष, झारगडवाडी येथील ६० वर्षीय महिला, सस्तेवाडी येथील १६ वर्षीय युवक, श्रीरामनगर येथील ३१ वर्षीय पुरूष, गुनवडी येथील २४ वर्षीय पुरूष, देऊळगाव रसाळ येथील २७ वर्षीय महिला, निरावागज येथील ५९ वर्षीय पुरूष, २७ वर्षीय पुरूष व ३१ वर्षीय महिला, काटेवाडी येथील ४५ वर्षीय पुरूष, सगोबाचीवाडी येथील ५८ वर्षीय पुरूष, देसाई इस्टेट येतील ५० वर्षीय पुरूष, कारखेल येथील ५० वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.
अशी माहिती वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ.मनोज खोमणे यांनी दिली.