बारामतीत काल तपासणी केलेल्या ६५ पैकी ६३ जणांचा अहवाल निगेटिव्ह.
समर्थनगर येथील ३५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण.
बारामतीत काल तपासणी केलेल्या ६५ पैकी ६३ जणांचा अहवाल निगेटिव्ह.
समर्थनगर येथील ३५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण.
बारामती : वार्तापत्र
बारामतीत काल तपासणी केलेल्या ६५ पैकी ६३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दुपारी सांगवीतील एक महिला पॉझिटिव्ह आल्यानंतर शहरातील समर्थनगर येथील आणखी एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
बारामतीत आरोग्य विभागाकडून काल ६५ जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. आज सकाळी यातील ३७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. तर उर्वरीत २८ जणांचा अहवाल प्रतीक्षेत होता. दुपारी २७ अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये सांगवी येथील महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता बारामती शहरातील समर्थनगर येथील ३५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अशी माहिती वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ. मनोज खोमणे यांनी दिली आहे.
मागील काही दिवसांत बारामतीतील रुग्ण संख्या वाढत आहे. त्यातच आज दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याने आता एकूण रुग्ण संख्या १३१ इतकी झाली आहे.