बारामतीत कोरोणा 7 च्या आत
बारामतीत आजपर्यंत एकूण रुग्ण संख्या 5710
बारामती वार्तापत्र
बारामतीत काल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या तुलनेत आज घट होत 7 इतकी रुग्ण संख्या पॉझिटिव्हआली आहे. आज बारामतीत शासकीय नमुन्यांची तपासणी झाली नाही.
मात्र खासगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 14 नमुन्यांपैकी 4 नमुने पॉझिटिव आले आहेत.
तर एंटीजन तपासणीमध्ये 12 नमुन्यांपैकी 3 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सर्व तपासन्यामधुन एकूण 7 इतकी घटती रुग्ण संख्या बारामतीत आज आहे.
बारामतीत आजपर्यंत एकूण रुग्ण संख्या 5710 इतकी असून
बरे झालेले रुग्ण 5380 तर मृत्यू झालेले रुग्ण 136 अशी आकडेवारी आहे.
तुम्ही घरी रहा ,सुरक्षित रहा मास्क वापरा ,सॅनिटायझर लावा अनावश्यक गर्दी टाळा, घाबरू नका काळजी घ्या.