बारामतीत कोरोनाचा कहर चालुच, आज 84 जणांचा अहवाल पाॅझिटीव्ह.
बारामती एकूण मृत्यू- 45.झालाा आहे.
बारामतीत कोरोनाचा कहर चालुच, आज 84 जणांचा अहवाल पाॅझिटीव्ह.
आज सकाळपर्यंत-84. शहर -33 ग्रामीण- 51 एकूण बारामती रुग्णसंख्या- 1372. बारामती एकूण मृत्यू- 45. एकूण बरे झालेले रूग्ण- 595.
बारामती वार्तापत्र
प्रतीक्षेतील 87 जणांच्या अहवाला पैकी शहरातील पाच रुग्ण पॉझिटिव आढळून आले आहेत व 82 जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे.
बारामती मध्ये एकूण घेतलेल्या RT – PCR 258 पैकी पॉझिटिव्ह- 32,निगेटिव- 105, प्रतीक्षेत-119 तसेच इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह -02 तसेच शासकीय एंटीजेन नमुने घेतलेले -38 पॉझिटिव्ह-20 निगेटिव्ह -28 तसेच खाजगी प्रयोगशाळेत घेतलेले नमुने 106 पैकी पॉझिटिव्ह- 32 निगेटिव्ह 74 कालचे एकूण पॉझिटिव्ह
आज आढळून आलेल्या व काल तपासणी झालेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पणदरे येथील 40 वर्षीय महिला, 55 वर्षे महिला, 70 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय युवक, 7 वर्षीय मुलगा, 66 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
कन्हेरी येथील 40 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, 22 वर्षीय युवक, 75 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. वाणेवाडी येथे 58 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथे 25 वर्षीय युवक, सोनकसवाडी येथे 50 वर्षीय महिला व 22 वर्षीय महिला रुग्ण आढळून आले आहेत.
गुणवडी येथे तीस वर्षीय महिला, 68 वर्षीय पुरुष, 9 वर्षीय मुलगी, सिद्धेश्वर गल्ली येथे 65 वर्षीय महिला, तक्षशिला नगर येथे 21 वर्षीय युवक रूग्णाचा समावेश आहे.
मळद येथे 55 वर्षीय महिला, कोळोली येथे 53 वर्षीय पुरुष व 62 वर्षीय पुरुष, बारामती शहरात 4 वर्षीय मुलगी व 44 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
चौधरवाडी येथे 13 वर्षीय पुरुष, शिरवली येथे 50 वर्षीय महिला, होळ आठ फाटा येथे 17 वर्षीय मुलगी, 37 वर्षीय महिला व 12 वर्षीय मुलीचा समावेश आहे.
निंबुत येथे 39 वर्षीय महिला व 68 वर्षे पुरुष, तांबेनगर येथे 51 वर्षीय पुरुष व वाडेकर इस्टेट येथे 26 वर्षीय महिला रुग्णास कोरोनाची बाधा झाली आहे.
बारामती मध्ये झालेल्या खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी मध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये कोहिनूर पार्क भिगवण रोड येथील दहा वर्षीय मुलगी व 37 वर्षीय महिला, अनंत आशानगर येथील 34 वर्षीय पुरुष रूग्णाचा समावेश आहे.
विश्वासनगर गुणवडी रोड येथील 42 वर्षीय महिला व 21 वर्षीय महिला, सर्वोदय नगर आमराई येथील 34 वर्षीय पुरुष, महालक्ष्मी एलाईट जळोची रोड येथील सहा वर्षे मुलगी, सूर्यनगरी येथील 44 वर्षीय पुरुष, ग्रीन पार्क येथील 47 वर्षीय पुरुष रूग्णाचा समावेश आहे.
अंबर्डैकर हॉस्पिटल समोर 70 वर्षीय महिला, देशपांडे हॉस्पिटल समोर 25 वर्षीय पुरुष, कसबा येथे 12 वर्षीय मुलगी, कवी मोरोपंत सोसायटी 23 वर्षीय युवक, युनिक रेसिडेन्सी भिगवण रोड येथे 29 वर्षीय महिला, समर्थ नगर गुणवडी रोड येथे 42 वर्षीय पुरुष, वसंतनगर येथे 53 वर्षीय पुरुष, मोरगाव रोड येथे 36 वर्षीय पुरुष, उत्कर्ष आयकॉन माळेगाव रोड येथे तीस वर्षीय महिला, विजयश्री विद्या नगर येथे 23 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
याखेरीज शासकीय एंटीजेन तपासणीमध्ये 20 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
अशी माहिती वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ.मनोज खोमणे यांनी दिली.