बारामतीत कोरोनाचा भडका..बारामतीत आज सकाळी 44 आणि आत्ता24 तर एकुण 68.
सकाळपासून आत्तापर्यंत एकूण 26 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून आज दिवसभरातील संख्या 42+ 26 =68 झालेली आहे व बारामतीची रुग्णसंख्या 748 झालेली आहे.
बारामतीत कोरोनाचा भडका..बारामतीत आज सकाळी 44 आणि आत्ता24 तर एकुण 68.
बारामतीत कोरोनाचा हाहाकार सुरू झाला असून आज दिवसभरात आजपर्यंतच्या काळातील सर्वात उच्चांकी कोरोनाग्रस्तांची संख्या बारामतीत आढळली. आज दिवसभरात बारामती तब्बल 68 जण कोरोना बाधित झाले आहेत.
बारामती वार्तापत्र
बारामतीची वाटचाल आता 1000 कोरोनाग्रस्तांच्या दिशेने सुरू झाली आहे, कारण आज अखेर बारामतीत कोरोना ग्रस्तांची एकूण संख्या तब्बल 748 एवढी झाली आहे.
काल घेतलेल्या नमुन्यांपैकी उर्वरित 26 जणांचा अहवाल प्रतिक्षेत होता, तो प्राप्त झाला असून त्यामध्ये शहरातील एक व ग्रामीण भागातील एका जणाचा अहवाल आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आलेला आहे व 24 जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे.
आज दिवसभरामध्ये खाजगी प्रयोगशाळेमध्ये एकूण 39 जणांचे नमुने एंटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी शहरातील सात व ग्रामीण भागातील तीन असे एकूण 10 जणांचे अहवाल एंटीजेन पॉझिटिव्ह आलेले आहेत. 29 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
ग्रामीण रुग्णालय रुई येथे आज दिवसभरात एकूण 38 जणांचे नमुने एंटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी शहरातील 11 आणि ग्रामीण भागातील तीन असे एकूण 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यामुळे सकाळपासून आत्तापर्यंत एकूण 26 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून आज दिवसभरातील संख्या 68 झालेली आहे व बारामतीची रुग्णसंख्या 748 झालेली आहे.
अशी माहिती वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ.मनोज खोमणे यांनी दिली.