बारामतीत कोरोनाने तिघांचे मृत्यू ही निवळ अफवा:- वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज खोमणे.
कोरोनाने एक तर इतर आजाराने दोघांचा मृत्यू.

बारामतीत कोरोनाने तिघांचे मृत्यू ही निवळ अफवा:- वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज खोमणे.
कोरोनाने एक तर इतर आजाराने दोघांचा मृत्यू.
बारामती वार्तापत्र
बारामतीत रात्रीत तिघा जणांचा मृत्यू झाल्याची अफवा संपूर्ण बारामती तालुक्यामध्ये असून या मध्ये तथ्य नसलेचे माहिती आज सकाळी वैद्यकीय तालुका अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी दिली असून बारामतीत उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांपैकी एकाचा मृत्यू हा कोरोनाने झाला असून उर्वरित दोन जणांचा अन्य आजाराने मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. यामध्ये एक जण कोरोनाग्रस्त, एकास अन्य आजाराचा रुग्ण होता तर तिसरा रुग्ण हा त्यांच्या कुटुंबामध्ये कोरोना चा रुग्ण असलेला परंतु इतर आजार असलेला होता.
बारामतीमध्ये रात्री झालेल्या या तीन मृत्युने कोरोनाने मृत्यू झाल्याची एकच अफवा शहरासह बारामती तालुक्यात होती.
कोरोनाग्रस्त असलेल्या व्यक्तीचे आज सकाळी निधन झाले. व्यवसायाने औषध विक्रेता असलेल्या या कोरोनाग्रस्तावर बारामतीतील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती खालावत जाऊन ते उपचाराला प्रतिसाद देण्याचे प्रमाण कमी झाले व आज त्यांचा दुर्दैवी अंत झाला. तसेच समर्थ नगर गुणवडी येथील एका जेष्ठ व्यक्तीचा अन्य आजाराने पहाटे मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबात कोरोनाग्रस्त आढळल्याने त्यांचा अंत्यविधी बारामती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केला. दरम्यान सोमेश्वरनगर येथील एका रुग्णावर बारामतीत उपचार सुरू होते. त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला होता, परंतु त्यांना अन्य आजार असल्याने त्यांचे रात्री निधन झाले असतानाच अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन वैद्यकीय तालुका अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी केले आहे.