बारामतीत कोरोना ग्रस्तांची नव्याने 10 जणांची भर.
बारामतीत आज कोरोनाच्या 80 संशयितांची तपासणी झाल्यानंतर त्यापैकी तब्बल 22 जण कोरोना बाधित आढळले आहेत.
बारामतीत कोरोना ग्रस्तांची नव्याने 10 जणांची भर.
बारामती :वार्तापत्र
बारामतीत आज कोरोनाच्या 80 संशयितांची तपासणी झाल्यानंतर त्यापैकी तब्बल 22 जण कोरोना बाधित आढळले आहेत.
आज बारामतीत दुपारी पर्यंत 80 कोरोना नमुन्यांपैकी 22 अहवाल प्रलंबित होते त्यामध्ये बारा जण कोरोना बाधित आढळून आले होते. दुपारनंतर च्या अहवालातील प्रलंबित राहिलेल्या नमुन्यांचा अहवाल आला असून, नव्याने 10 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामध्ये
शासकीय अहवालात नमूद केलेल्या पत्त्यानुसार जीवराज नगर येथील 43 वर्षीय पुरुष, भोई गल्ली येथील वीस वर्षीय युवक, आमराई येथील 24 वर्षीय महिला, जगताप मळा येथील 45 वर्षीय महिला, भोई गल्ली येथील 70 वर्षीय पुरुष, इंदापूर रस्त्यावरील 53 वर्षीय पुरुष, कसबा येथील 50 वर्षीय महिला, बारामती ॲग्रो येथील 49 वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथील तीस वर्षीय पुरुष व मलगुंडे वस्ती येथील 21 वर्षीय युवतीचा यामध्ये समावेश आहे.