
बारामतीत कोरोना ने केले अर्धशतक पार
शहरात ३४ तर ग्रामीण भागात १८ रुग्ण
बारामती वार्तापत्र
बारामतीत आज कोरोना पॉझीटीव्ह रूग्णां ची एकूण रुग्ण संख्या ५२ झाली आहे.
शासकीय rt-pcr १९६ नमुन्यामधून २७ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण ३८ rt-pcr रुग्णांपैकी १५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या १७ नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह ९ रुग्ण आहेत.
शहरातील ३४ तर ग्रामीण भागातील १८ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.
बारामतीत काल झालेल्या शासकीय प्रयोगशाळेत आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये खांडज येथील ६० वर्षे पुरुष, भिगवण रोड येथील ३२ वर्षीय महिला, शिवाजीनगर येथील ७० वर्षीय मुलगा, पणदरे येथील ४० वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, सांगवी येथील ३६ वर्षीय पुरुष, तांदुळवाडी येथील ४० वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील २५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
माळेगाव येथील २१ वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील ४९ वर्षीय महिला, वसंतनगर येथील ४० वर्षीय महिला, मोरयानगर येथील ५८ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला, मेडद येथील मेडद येथील ४८ वर्षीय पुरुष, सिनेमा रोड येथील ५५ वर्षीय पुरुष, कोष्टी गल्ली येथील येथील ३७ वर्षीय पुरुष,४५ वर्षीय महिला, ५७ वर्षीय पुरुष, शिक्षक कॉलनी येथील ४० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
सुपा येथील ४८ वर्षे महिला, २४ वर्षीय पुरुष, बारामती शहरातील २८ वर्षीय महिला, पणदरे येथील १८ वर्षीय युवक, वडगाव निंबाळकर येथील ३६ वर्षीय पुरुष, बर्हाणपूर येथील ३० वर्षीय महिला, काटेवाडी येथील ४९ वर्षीय पुरुष, तांबे नगर येथील ३३ वर्षीय पुरुष, जळोची येथील ३६ वर्षीय पुरुष, कसबा येथील २५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बारामतीत काल मंगल लॅबोरेटरी खाजगी प्रयोगशाळेत येथे तपासलेल्या विविध नमुन्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पियाजियो रेसिडेन्सी बिल्डींग एमआयडीसी येथील ४९ वर्षीय पुरुष, वैष्णव कुंज अपार्टमेंट विजय नगर येथील ४० वर्षे पुरुष, पितृ पुण्याई बंगला अशोक नगर येथील ५० वर्षीय पुरुष, पाटस रोड देशमुख वस्ती येथील ४४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
आनंदनगर हिरानंद बंगला येथील ५८ वर्षीय महिला, सुपा येथील ६८ वर्षीय पुरुष, करंजेपुल जिल्हा परिषद शाळे शेजारील ५९ वर्षीय महिला, भोंडवेवाडी मोरगाव येथील ८५ वर्षीय पुरुष, ढाकाळे येथील २९ वर्षीय पुरुष, विठ्ठलवाडी, खांडज येथील ५७ वर्षीय पुरुष, ४६ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
महालक्ष्मी विला यामाहा शोरूम मागे २६ वर्षीय महिला, ऋतुगंध अपार्टमेंट संभाजीनगर येथील ४२ वर्षीय पुरुष, खत्री इस्टेट येथील ३१ वर्षीय पुरुष, वैष्णव कुंज अपार्टमेंट विजय नगर येथील १२ वर्षीय मुलगी, गिरनार बिल्डींग सिनेमा रोड येथील ५९ वर्षीय पुरुष, सोनिया अपार्टमेंट वाघोलीकर पार्क येथील ५१ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या ६९८९ आहे तर बरे झालेले रुग्ण ६४७१ व एकूण मृत्यु १४७ इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .
तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा. अनावश्यक गर्दी टाळा