बारामतीत कोरोना पाय पसरतोय आज कोरोणाची संख्या 22 वर पोहोचली,, रुग्ण संख्या वाढतेय काळजी घ्या !
शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढली
बारामतीत कोरोना पाय पसरतोय आज कोरोणाची संख्या 22 वर पोहोचली,, रुग्ण संख्या वाढतेय काळजी घ्या !
शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढली
बारामती वार्तापत्र
बारामतीत आज कोरोना ची एकूण रुग्ण संख्या 22 झाली आहे.
शासकीय rt-pcr 134नमुन्यामधून 12 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण 15 rt-pcr रुग्णांपैकी 4 रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या 27 नमुन्यांपैकी 6 पॉझिटिव्ह आले.
शहरातील 8 तर ग्रामीण भागातील 14रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.
शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात 6 ने रुग्णसंख्या जास्त आहे.
बारामती तालुक्यात काल 22 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. या आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पिंपरी येथील 27 वर्षीय महिला, विवेकानंद नगर येथील 41 वर्षीय पुरुष, सटवाजीनगर येथील 50 वर्षीय पुरुष, सांगवी येथील 76 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगा, नारोळी सुपा येथील एक 24 वर्षीय पुरुष, लिमटेक येथील 60 वर्षीय पुरुष, वैद्यकीय महाविद्यालय येथील 19 वर्षीय पुरुष, पणदरे येथील चार वर्षीय मुलगा, 21 वर्षीय पुरुष, मूर्टी येथील सहा वर्षीय मुलगी, 58 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून
आले आहेत.
काल बारामतीत झालेल्या शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सायली हिल येथील 79 वर्षीय पुरुष, उत्कर्ष नगर येथील 40 वर्षीय पुरुष व माळवाडी येथील 72 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अंटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये निरावागज येथील बुरुंगले वस्ती येथील 57 वर्षीय पुरुष, माळेगाव विद्यानगर येथील 14 वर्षीय मुलगा, खराडे वाडी येथील 44 वर्षीय पुरुष, तांदुळवाडी रोड येथील 39 वर्षीय महिला, पिंपळी लिमटेक येथील 65 वर्षीय पुरुष व गोकुळनगर मळद येथील 76 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 6140आहे तर बरे झालेले रुग्ण 5870व एकूण मृत्यु 142 इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .
तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा. अनावश्यक गर्दी टाळा