बारामतीत गळफास घेऊन महिलेची आत्महत्या.
बारामती तालुक्यातील पिंपळी येथील महिलेने गळफास.

बारामतीत गळफास घेऊन महिलेची आत्महत्या.
बारामती वार्तापत्र : बारामती तालुक्यातील पिंपळी येथील महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. छाया बाळासो वाघमोडे (वय ५० रा. पिंपळी ता. बारामती ) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मृत महिला सोमवारी (दि.१) रोजी सायंकाळी हातावर देवीची परडी घेऊन जोगवा मागण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. मात्र रात्री उशीरा पर्यंत सदर महिला घरी न परतल्याने घरातील सदस्यांनी शोधाशोध केली मात्र त्या कोठेही आढळून आल्या नाहीत. मंगळवारी झारगडवाडी ( ता. बारामती) गावातील एक शेतकरी शेतातील पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना सकाळी सातच्या सुमारास लिंबाच्या झाडाला सदर महिला गळफास अवस्थेत आढळून आली. मृत महिलेचे दीर हनुमंत वाघमोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली. पुढील तपास पोलीस हवालदार राजेंद्र जाधव करीत आहे.