स्थानिक

बारामतीत गावठी रिव्हॉल्वर जवळ बाळगणारा आरोपी जेरबंद

आरोपी दुसऱ्यांना शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटकेत

बारामतीत गावठी रिव्हॉल्वर जवळ बाळगणारा आरोपी जेरबंद

आरोपी दुसऱ्यांना शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटकेत

बारामती वार्तापत्र

बारामती शहर पोलीस स्टेशन हदीत अवैधरित्या बेकायदा गावठी रिवाल्वर बाळगल्याप्रकरणी प्रतीक भालचंद्र शिंदे वय 25 राहणार हरिकृपा नगर यास दुसऱ्यांदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

मा.पोलीस अधिक्षक सो पुणे ग्रामीण यांचे आदेशाने शस्त्र बाळगणारे रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक करणेबाबतचे दिलेल्या सुचने
प्रमाणे बारामती शहर हदद्दीतील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व वाढते गुन्हयाच्या अनुषंगाने खाजगी वाहनाने पेट्रोलिंग
करीत असताना बारामती हॉस्पिटलचे मागे ०१:४५ वा.चे.सुमारास रेकॉर्ड वरील गुन्हेगार प्रतिक भालचंद्र शिंदे वय २५ वर्षे रा. हरीकृपानगर इंदापुररोड ता.बारामती जि.पुणे यावर यापुर्वी ३१६/२०२० भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल असलेला व त्याचेकडुन पुर्वी दोन पिस्टल जप्त करण्यात आलेला गुन्हेगार संशयीत रित्या फिरत असताना मिळुन आला.

त्यास पोलिसांनी इकडे कोणत्या कामासाठी आला असे विचारले असता त्याने उडवा उडविची उत्तरे देवुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला असता त्यास शिताफीने पकडुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेला २५,०००/-रूपये किमतीचे एक गावटी बनावटीचे काळे रंगाचे लोखंडी रिव्हाल्व्हर मिळुन आले दोन पंचासमक्ष मुददेमाल ताब्यात घेतला आहे.रिव्हाल्व्हर चे संदर्भाने सखोल चौकशी सुरू आहे.

YouTube player

सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री.अभिनव देशमुख साो.व मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.मिलींद मोहीते सो, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर सो,मा.पोलीस निरीक्षक श्री नामदेव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक श्री प्रकाश वाघमारे, सहा.पो.उपनिरीक्षक संजय जगदाळे,संदिपान माळी,पो.हवा.अनिल सातपुते ,गोपळ आंबासे पोलीस नाईक रूपेश साळुखे,दादासाहेब डोईफोडे,पो.कॉ.सुहास लाटणे,अंकुश दळवी,दशरथ इंगवले,बंडु कोठे,योगेश कुलकर्णी,अजित राऊत,तुषार चव्हाण,अकबर शेख,यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!