बारामतीत घशाचे नमुने घेण्यात काही अडचणी येत आहेत का? आज देखील 24 नमुने अनिर्णित !
आज देखील तब्बल 24 नमुने स्विकारले गेले नाहीत ते अनिर्णित ठेवलेले आहेत.
बारामतीत घशाचे नमुने घेण्यात काही अडचणी येत आहेत का? आज देखील 24 नमुने अनिर्णित !
आज देखील तब्बल 24 नमुने स्विकारले गेले नाहीत ते अनिर्णित ठेवलेले आहेत.
बारामती वार्तापत्र
संशयित कोरोनाच्या रुग्णाने स्वाब दिल्यानंतर इतरत्र कुठेही फिरू नये यासाठी प्रशासन जीवापाड प्रयत्न करत असताना, जिथे घशातील स्त्रावाचे नमुने घेतले जात आहेत, तिथे पुन्हा पुन्हा ते घेण्यात चुका घडत आहेत. मागील आठवड्यात 32 नमुने पुन्हा घ्यावे लागले, काल (ता. 2) काही नमुने अनिर्णित होते आणि आज देखील तब्बल 24 नमुने स्विकारले गेले नाहीत ते अनिर्णित ठेवलेले आहेत.
बारामतीत गेल्या दोन दिवसापासून शंभरावर रुग्ण आढळत आहेत त्यामुळे बारामतीतील चिंता वाढली असतानाच घशातील स्रावाचे नमुने व्यवस्थित न घेण्याने कोरोना चा प्रसार आणखी होऊ शकतो हे लक्षात घेऊन स्त्रावाचे नमुने घेणाऱ्यांनी ते काळजीपूर्वक घेतले पाहिजेत अशी अपेक्षा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केली आहे. काही खाजगी प्रयोगशाळांविरुद्ध ज्या वेळी मते व्यक्त केली जातात, तेव्हा सरकारी यंत्रणा देखील तेवढीच सक्षम असायला हवी.
कोरोनाच्या संस्थेत रुग्णाने आज स्वाब दिल्यानंतर त्याचे परिणाम रात्री उशिरा किंवा दुसर्या दिवशी सकाळी मिळत आहेत, अशा परिस्थितीमध्ये जर स्वाब अनिर्णित राहिला, आणि त्या रुग्णास तो पुन्हा देण्याची वेळ आली, तर या प्रक्रियेमध्ये दोन ते तीन दिवस जात आहेत. त्यातून खरोखरच कोरोना बाधित असलेल्या रुग्णासाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते.
त्यामुळे यापुढील काळात घशातील स्त्रावाचे नमुने प्रयोगशाळेकडून अनिर्णित ठेवले जाणार नाहीत यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी जागरूक राहण्याची गरज आहे.