बारामतीत जिजाऊ जयंती साजरी
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सोशल डिस्टंसिंग पाळून साध्या पद्धतीने पुजन करण्यात आले.
बारामतीत जिजाऊ जयंती साजरी
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सोशल डिस्टंसिंग पाळून साध्या पद्धतीने पुजन करण्यात आले.
बारामती वार्तापत्र
तालुका मराठा सेवा संघातर्फे दरवर्षी प्रमाणे राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. जिजाऊ भवन येथील जिजाऊ व बालशिवाजी यांचे पुतळा यांना नगराध्यक्ष पोर्णिमा तावरे यांचे हस्ते पुष्पहार घालुन साजरी करण्यात आली.
याप्रसंगी संघाचे अध्यक्ष नामदेव तुपे, वैशाली नागवडे, वनिता बनकर, भाग्यश्री धायगुडे, अनिता गायकवाड, हेमलता परकाळे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सोशल डिस्टंसिंग पाळून साध्या पद्धतीने पुजन करण्यात आले. जयंती निमित्त प्रशासनाच्या आवाहनानुसार 17 जानेवारी रोजी मराठा उद्योग समुहाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
दरम्यान जिजाऊ सेवा संघाच्या महिलांनी यावेळी जिजाऊ वंदना गायली. या प्रसंगी सेवा संघाचे प्रमुख कार्यकर्ते सौ स्वाती ढवाण यांचा पिंपळी ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवडून आल्याबद्दल सत्कार करण्यात आला.