कोरोंना विशेष

राज्य सरकारकडून कालपासून नवे निर्बंध लागू ,’ही’ नियमावली पाळावीच लागणार

15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबतही निर्यण

राज्य सरकारकडून कालपासून नवे निर्बंध लागू ,’ही’ नियमावली पाळावीच लागणार

15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबतही निर्यण

मुंबई : प्रतिनिधी

आज 2021 वर्षाचा शेवटचा दिवस. उद्या नवीन वर्षाचा आरंभ होतोय. 2022 मध्ये प्रवेश करत असताना कोरोना आणि ओमायक्रॉनचं संकट वाढत चाललं आहे. त्यामुळं नवीन वर्षात प्रवेश करताना आपल्याला नव्या निर्बंधांसह करावा लागणार आहे.  राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच चिंतेत वाढ झाली आहे. आरोग्य विभाग, टास्क फोर्स यांच्यातील झालेल्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत.

सरकारकडून कालपासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळे फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत करता येणार आहेत. तर अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.  पर्यटनस्थळावर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे.

मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची वाढ होऊ लागली आहे. ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. त्यामुळे गुरुवारी टास्कफोर्ससोबत झालेल्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहेत निर्बंध?
सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळे फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत
अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांची उपस्थिती
पर्यटनस्थळावर जमावबंदी
कोरोनाबाबत आधीचे निर्बंधही कायम राहतील

नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि आवाहन

31 डिसेंबरच्या अनुषंगाने आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर इतकंच सांगेन की, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्ष कोरोनापासून मुक्ती असणारं वर्ष असावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. असं सांगत असतानाच गर्दी टाळावी, संसर्ग होईल असं कुठलंही कार्य करू नका. कोरोना नियमावलीचं पालन करा, असं आवाहनही टोपे यांनी यावेळी केलं आहे.

Related Articles

Back to top button