बारामतीत तीन नवीन साठवण तलाव उभारले जाणार आहेत.
घारे इस्टेट 190, तांदुळवाडी 250 तर जळोचीच्या साठवण तलावाची क्षमता 180 दशलक्ष लिटर्स इतकी असेल.
बारामतीत तीन नवीन साठवण तलाव उभारले जाणार आहेत.
घारे इस्टेट 190, तांदुळवाडी 250 तर जळोचीच्या साठवण तलावाची क्षमता 180 दशलक्ष लिटर्स इतकी असेल.
बारामती वार्तापत्र
बारामतीच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा नीरा डावा कालव्याच्या आवर्तनावर अवलंबून असतो. दरवर्षी उन्हाळ्यात नीरा डावा कालव्याचे आवर्तन लांबल्यावर बारामतीला दोन किंवा तीन दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत होता. हे दुखणे कायमचे संपवून टाकण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत सध्याच्या दोन साठवण तलावांव्यतिरिक्त घारे इस्टेट, तांदुळवाडी व जळोची येथे तीन नवीन साठवण तलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.
घारे इस्टेट 190, तांदुळवाडी 250 तर जळोचीच्या साठवण तलावाची क्षमता 180 दशलक्ष लिटर्स इतकी असेल. या पैकी घारे इस्टेट तलावाचे काम सध्या वेगाने सुरु असून लवकरच उर्वरित दोन्ही तलावांची कामेही मार्गी लागणार आहेत. सध्या बारामतीतील दोन्ही साठवण तलावांची क्षमता 483 दशलक्ष लिटर्स इतकी आहे. नव्या साठवण तलावाची क्षमता 620 द.ल. लिटर्स इतकी असेल. दोन्ही मिळून बारामती नगरपालिकेची साठवण क्षमता 1103 द.ल. लिटर्स इतकी होईल.
या तिन्ही तलावांचे काम होण्यासाठी 2023 साल उजाडेल असा प्राथमिक अंदाज आहे. 2023 ते 2038 आणि 2038 ते 2053 असा आगामी 30 वर्षांचा विचार व वाढणारी अंदाजे लोकसंख्या गृहीत धरुन हा प्रकल्प अजित पवार यांनी हाती घेतला आहे. आगामी काळात नगरपालिकेचा वाढलेला विस्तार व शहराची वाढलेली लोकसंख्या विचारात घेता दैनंदिन 25 दशलक्ष लिटर्स दररोज पाणी लागेल असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यातही बारामतीला सातही दिवस चोवीस तास पाणी देण्याचे अजित पवार यांचे स्वप्न आहे. त्याचा विचार करता सर्व साठवण तलावांचे काम पूर्ण झाल्यानंतर 53 दिवस पुरेल इतका पाणीसाठा या सर्व तलावात असेल.