बारामतीत दहा जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह.
एकूण रुग्ण संख्या १७५ झाली
बारामती :वार्तापत्र
बारामती मध्ये दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे काल बारामती मध्ये एकूण ७३ स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी ७१ जणांचा अहवाल प्राप्त झाला आहे व दोन जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे यामध्ये एकूण ५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आला असून बारामतीमधील दहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे व इतर जिल्ह्यातील दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
बारामती शहरातील ५ जणांचा व ग्रामीण भागातील पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे शहरामध्ये देसाई इस्टेट मधील एक, सुहास नगर मधील एक, खंडोबा नगर मधील एक,पाटस रोडवरील एक व बारामती शहरांमध्ये एक असे पाच व वंजारवाडी एमआयडीसीतील एक, जळगाव सुपे मधील एक माळेगाव बुद्रुक मधील १ व मळद येथील बारामती मध्ये कंपनीत काम करणारा एक रुग्ण व डोरलेवाडी तील रुग्णाच्या संपर्कातील एक असे ५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत बारामतीची एकूण रुग्ण संख्या १७५ झाली आहे.
सुहासनगर येथील २५ वर्षीय युवक, जळगाव सुपे येथील ३७ वर्षीय महिला, मळद येथील ३८ वर्षीय युवक, खंडोबानगर येथील २५ वर्षीय युवक, डोर्लेवाडी येथील २५ वर्षीय युवक, देसाई इस्टेट येथील ४० वर्षीय पुरुष, कुंभारकर वस्ती येथील २२ वर्षीय युवक, बारामती शहर येथील ५९ वर्षीय पुरुष, पाटस रोड येथील पंधरा वर्षीय मुलगी, माळेगाव येथील ४३ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
तरी काळजी घेण्याचे आव्हान तालुका आरोग्य अधीकारी डॉ मनोज खोमणे यांनी केले आहे.