बारामतीत दिव्यांग लाभार्थ्यांना बॅटरीवरील तीन चाकीचे वितरण
या योजनेमधुन एकशे चाळीस लाभार्थ्यांना या ट्रायसीकलचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.
बारामतीत दिव्यांग लाभार्थ्यांना बॅटरीवरील तीन चाकीचे वितरण
या योजनेमधुन एकशे चाळीस लाभार्थ्यांना या ट्रायसीकलचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती लोकसभा मतदार संघातील तीव्र अस्थिविकलांग लाभार्थ्यांना एडीआयपी योजनेअंतर्गत ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत मोटोराईज्ड ट्रायसीकलचे वितरण करण्यात आले.
या योजनेमधुन एकशे चाळीस लाभार्थ्यांना या ट्रायसीकलचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात बारामती येथुन झाली. या मोटोराईज्ड ट्रायसीकलमुळे त्यांना दैनंदिन व्यवहार करणे सोपे जाणार असून दळणवळणाच्या दृष्टीने फायद्याचे ठरणार आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विद्या प्रतिष्ठान बारामती, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व महात्मा गांधी सेवा संघ जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राच्या वतीने या मोटोराईज्ड ट्रायसीकल्सचे वाटप करण्यात आले.या वेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते.