दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार.
भाजप- रासपतर्फे आंदोलन ,दूध ओतून केलेल्या भावना व्यक्त .
बारामती- मागील काही दिवसांपासून राज्यात दूध आंदोलन पेटले आहे. दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे दुधाला ५ ते १० रुपये दर वाढवून मिळावा, खाजगी दूध डेअरीत १९ रुपयांपर्यंत दुधाचे दर खाली उतरले आहेत. त्यामुळे दूध दर वाढ होणे आवश्यक आहे या मागणीसाठी भाजपा, रासपच्या वतीने बारामती येथील पेन्सिल चौक व तालुक्यातील काटेवाडी येथे दूध ओतून सरकारविरोधी घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.
दुधाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी सरकारला वेळोवेळी निवेदन देण्यात आले तसेच पांडुरंगाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालण्यात आला मात्र तरीसुद्धा सरकार दूधवाढीसाठी ठोस भूमिका घेत नाही. तसेच सरकार कोणत्याही प्रकारे दुध या विषयावर बोलायला तयार नाही .त्यामुळे आज बारामतीत रस्त्यावर येऊन दुध ओतून आंदोलन करण्याची वेळ आल्याचे आंदोलकांनी सांगितले.
सरकारने लवकरात लवकर दुधाला योग्य भाव वाढवून द्यावा अन्यथा पुढील काळात तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष व भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.