बारामतीत तीन जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
बारामती ची रुग्णसंख्या 279 झाली आहे.
बारामती :वार्तापत्र
काल एकूण 42 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 31 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून आठ जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
बारामती तालुक्यातील सांगवी येथील 26 वर्षाचा पुरुष, श्री राम गल्ली येथील 50 वर्षाची महिला व जैनकवाडी येथील 65 वर्षाचा पुरुष असे तिन रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आलेले आहेत.
अशी माहिती तालुका अधिकारी मनोज खोमणे यांनी दिली.