बारामतीत दोन दिवसात ८६ संशयिताचे स्वॅब घेण्यात आले असून ३२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून बाकी व्यक्तींचा अहवाल येणे बाकी.
डॉ.मनोज खोमणे यांनी दिली माहिती..
बारामतीत दोन दिवसात ८६ संशयिताचे स्वॅब घेण्यात आले असून ३२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून बाकी व्यक्तींचा अहवाल येणे बाकी…
डॉ.मनोज खोमणे यांनी दिली माहिती..
बारामती:-प्रतिनिधी
दि.४ जुलै रोजी बारामती शहरात एकाच दिवशी ५ रुग्ण आढळून आले होते या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ५४ जणांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान शहरात दोन दिवसात ८६ संशयितांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यामधील ३२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून बाकी व्यक्तींचा अहवाल येणे बाकी आहे अशी माहिती स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यानी दिली आहे.
३२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला असून बाकी संशयितांचा अहवाल काय येतो याकडे तालुक्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
दरम्यान शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच मास्कचा व सँनीटायझर चा वापर करावा,विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.