क्राईम रिपोर्ट

बारामतीत पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून खून ; पतीवर खुनाचा गुन्हा दाखल

शस्त्राने गंभीर वार केलेल्या महिलेचा पुण्यात मृत्यू!

बारामतीत पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून खून ; पतीवर खुनाचा गुन्हा दाखल

शस्त्राने गंभीर वार केलेल्या महिलेचा पुण्यात मृत्यू!

बारामती वार्तापत्र

बारामतीत चारित्र्याच्या संशयावरून धारदार शस्त्राने वार केल्याने जखमी झालेल्या विवाहितेचे उपचारा दरम्यान पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झाला.

संजना लहू वायकर असे या विवाहिते चे नाव आहे. या प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, याप्रकरणी महिलेचे भाऊ भगवान हनुमंत बिरदवडे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शहर पोलिसांनी या प्रकरणी तिचा पती लहू रामा वायकर (वय ४८, रा. बांदलवाडी, ता.बारामती) याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. दि. २५ रोजी संजना यांच्यावर पतीकडून चारित्र्याचा संशय घेत त्या कारणावरून संजना यांच्या डोक्यात, कपाळावर आणि चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. गंभीर जखमी झालेल्या संजना यांच्यावर पुणे शहरातील ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Related Articles

Back to top button