बारामतीत फायबर केबलची चोरी दोन संशयित ताब्यात, नागरिकांनी जागृत राहण्याची गरज
संशयित इसम फिरताना आढळल्यास त्याची चौकशी करावी ओळखपत्र पहावे
बारामतीत फायबर केबलची चोरी दोन संशयित ताब्यात, नागरिकांनी जागृत राहण्याची गरज
संशयित इसम फिरताना आढळल्यास त्याची चौकशी करावी ओळखपत्र पहावे
बारामती वार्तापत्र
बारामती, खंडोबा नगर येथील ग्रीन सिटी पार्क रेसिडेन्सी येथील बिल्डिंगचे टेरेस वरून टीव्ही चॅनल च्या केबलची चोरी झाल्याची फिर्याद बारामती शहर पोलीस स्टेशनला प्राप्त झाले आहे.
फिर्यादी सोनबा बापूराव पवार यांनी फिर्याद दिली की काही ग्राहकांनी मला फोन करून सांगितले की केबल दिसत नाही दुरुस्त करा म्हणून मी केबलची पाहणी करत असताना ग्रीन सिटी पार्क रेसिडेन्सी च्या बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊन पाहिले असता तेथील केबल सिस्टिमची रिसिव्हर मशीन व त्याची फायबर केबल कट केल्याचे दिसले केबलचे रिसिवर व मशीन चोरी करण्यात आली.
दरम्यान पवार यांनी चोरी प्रकरणाचा चौकशी केली असता ग्रीन्सिटी आपारमेंट येथील ई विंग च्या तळमजल्यावर सीसीटीवी रूम सीसीटीवी फुटेज पाहिले असता त्यामध्ये दिनांक 5 रोजी रात्री साडेदहा वाजता च्या सुमारास ऋषिकेश बुलबुले निखिल मुसळे हे त्या बिल्डिंग मध्ये काही काम नसताना संशयित रित्या फिरत होते या फूटेजमध्ये ऋषिकेश बुलबुले खिशामध्ये काहीतरी घेऊन जात असल्याचे दिसत आहे अशी फिर्याद पवार यांनी दिली आहे.
या चोरीतील दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मात्र शहरातील ग्राहकांनी आपल्या इमारतीच्या आसपास कोणी संशयित इसम फिरताना आढळल्यास त्याची चौकशी करावी ओळखपत्र पहावे त्यामुळे असे प्रकार भविष्यात घडणार नाहीत असे आवाहनही केबलचालक यांनी केले आहे.