बारामतीत बहुजन नायक कांशीराम यांना जयंतीनिमित्त अभिवादन
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कांशीराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण

बारामतीत बहुजन नायक कांशीराम यांना जयंतीनिमित्त अभिवादन
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कांशीराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
बारामती वार्तापत्र
येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे बामसेफ,बसपाचे संस्थापक,बहुजन नायक मान्यवर कांशीराम यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कांशीराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कांशीराम यांनी उत्तर प्रदेश सारख्या ऋषी-मुनींच्या धरतीत फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे सरकार बनवुन देशाच्या राजकारणाची दिशा बदलून,जी जात,जी जमात बैलगाडीत कधी बसली नव्हती त्या जातीला,जमातीला लालदिव्याच्या गाडीत बसविण्याचे महान क्रांतिकारी कार्य मान्यवर कांशीरामजींनी केले असल्याचे मत यावेळी बोलताना शुभम अहिवळे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी ॲड.सुशिल अहिवळे,गौतम शिंदे,सोमनाथ रणदिवे,सुनिल चव्हाण,अक्षय खरात,रितेश गायकवाड,चंद्रकांत भोसले,आकाश शेलार,श्याम तेलंगे,सुमित मोहिते,विनोद कळसाईत यांच्यासह आदी उपस्थित होते.