बारामतीत भर दिवसा महिलेवर चाकू हल्ला : आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
महिलेने या आरोपीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला
बारामतीत भर दिवसा महिलेवर चाकू हल्ला : आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
महिलेने या आरोपीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील नीरा डावा कालव्याशेजारील पूर्वा कॉर्नर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या केसरी टूर्सच्या कार्यालयातील एका महिलेवर (दि:१८) रोजी एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. सकाळी ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे.या हल्ल्यात युवतीच्या हातावर चाकू लागून ती जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार (दि:१८) रोजी सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास रजत टूर्सचे कार्यालय उघडल्यानंतर एक तरुण आला. मी काल आपल्या ऑफिसला येऊन गेलो. परंतु आपण काल ऑफिस लवकर बंद केले असे म्हणत या आरोपीने महिलेच्या गळ्यात हात घातला. हा तरुण चैन चोरतोय अशी शंका आल्याने या महिलेने त्याचा हात धरला. त्यावर माझा हात सोड असं म्हणत या आरोपीने थेट या महिलेच्या हातावर चाकूने वार करत पळ काढला.
या महिलेने या आरोपीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो आपली चप्पल न घालताच गाडीवर बसून पसार झाला. या महिलेच्या हाताला चाकू लागल्याने जखम झाली आहे. यासंदर्भात बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. दरम्यान या घटनेनंतर या परिसरातील सीसीटिव्ही फूटेज ताब्यात घेवून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.