बारामतीत भल्या सकाळी चोरी
प्रकार झाला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
बारामती वार्तापत्र
बारामतीतील मुख्य बाजारपेठेतील रत्नाकर बँक जवळील वीज वितरण कंपनीचा भुमीगत लाईट बॉक्सच्या झाकणाची चोरी करताना दोन महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळून आल्या आहेत. अनेक छोटे-मोठया चोरीकडे पोलीस प्रशासनाने लक्ष दिले नाही तर चोरी करणाऱ्यांची हिम्मत वाढून मोठ्या पद्धतीने चोरी करण्याची प्रवृत्ती वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलिसांनी अशा भुरट्या चोऱ्या करणाऱ्या व्यक्तींना रोखण्याची गरज निर्माण झाली आहे शहरात घराबाहेर असणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी ,दुकानाच्या समोरील काही वस्तू चोरण्याचा प्रकार अलीकडे वाढीस लागला आहे या महिलांना कोणी हटकले असता अरेरावीची भाषा करण्यात येते त्यामुळे पोलिसांनी आता यावर वचक ठेवणे व गस्त वाढविणे गरजेचे झाले आहे.
नगरपालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत.
खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून नगरपालिकेस सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला होता त्याचेही पुढे काय झाले हे अजून समजले नाही शहरातील अनेक गणपती मंडळांनी आपल्या परिसरामध्ये स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत मात्र नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे असल्यास अशा पद्धतीचे गैरप्रकार होणार नाहीत नगरपालिकेचे ही अशा छोट्या छोट्या चोरी मधून स्थावर मालमत्तेचे नुकसान होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
मोठ्या प्रमाणात कर मिळत असूनही सुविधांकडे दुर्लक्ष
शहरातील प्रमुख रस्त्यांवर असणाऱ्या व्यवसायिक दुकानदारांकडून नगरपालिका मोठ्या प्रमाणात कर वसूल करते मात्र त्याची उतराई म्हणून प्रशासनाने ठराविक अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत त्यामुळे दुकानदारांच्या होणाऱ्या चोऱ्यांवर आपोआपच अंकुश बसेल.
चोरी करताना जीवाची पर्वा नाही
या दोन महिला भुमीगत विजेच्या डीपी चे झाकण काढत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत मात्र थोडी जरी चूक झाली असती तरी या दोन्ही महिलांना आपल्या प्राणास मुकावे लागले असते कारण या विजेच्या बॉक्स चे झाकण या महिलांनी काढले त्यामधील वीजपुरवठा चालू होता त्याचेही भान या शुल्लक चोरी पुढे या महिलांना नव्हते असे दिसून येते