बारामतीत मध्यधुंद ट्रक चालकाचा धुडगूस ,सहा वाहनांना उडवलं
सामाजिक कार्यकर्ते सागर खलाटे यांचे धाडस
बारामतीत मध्यधुंद ट्रक चालकाचा धुडगूस ,सहा वाहनांना उडवलं
सामाजिक कार्यकर्ते सागर खलाटे यांचे धाडस
बारामती वार्तापत्र
शहरात आज सकाळी एका मध्यधुंद ट्रकचालकाने भिगवण रोडवरील सहा वाहनांना उडवले. त्यामुळे वाहनांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आज सकाळी एमआयडीसी येथुन भिगवण रस्त्याने शहराकडे जात असणाऱ्या एका उसाने भरलेल्या भरधाव ट्रकने रस्त्यात आडवी येतील त्या वाहनांना चिरडत पुढे जात होता.
हा ट्रक ड्रायव्हर दारू पिऊन ट्रक चालवत होता. दरम्यान अमरदीप हॉटेल च्या जवळ एका रिक्षाला जोरात धडक देऊन पुढे जात असताना धडके चा आवाज ऐकून सामाजिक कार्यकर्ते सागर खलाटे यांनी ट्रकचा पाठलाग सुरू केला.
पाठलाग करत असताना सागर खलाटे यांच्या दुचाकीला डिव्हायडर कडे दाबण्याचा प्रकारही ट्रक चालकाने केला.
त्यानंतर सागर खलाटे यांनी सर्व्हिस रोडवरून आपली दुचाकी घेऊन या ट्रकच्या पुढे गेले. दरम्यान ट्रक जैन मंदिराच्या समोर आला असताना हा ट्रक शहरात घालायचा की बाह्य मार्गाने देवीच्या मंदिराकडून इंदापूर रोड कडे न्यायचा या विचारात ट्रकचालकाने ट्रकचा वेग कमी केला. आणि ती संधी साधत सामाजिक कार्यकर्ते सागर खलाटे यांनी त्या ट्रकमध्ये चढुन त्या ट्रक चालकाला पकडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
सागर खलाटे यांच्या धाडसामुळे अनेक वाहनांनी अपघात झाला त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे सागर खराटे यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली व पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे मात्र या ट्रक चालकावर कारवाई झाली अथवा नाही याविषयी माहिती उपलब्ध नाही.