बारामतीत मनुस्मृतीचे दहन
93 वर्ष पूर्ण झाले त्याचे औचित्य साधून
बारामती वार्तापत्र
मनुस्मृतीमुळे छत्रपती शिवरायांचा मनुवाद्यांनी राज्याभिषेक नाकारला त्यामुळे 25 डिसेंबर 1927 रोजी रायगडाच्या पायथ्याशी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले होते त्या घटनेला आज 93 वर्ष पूर्ण झाले त्याचे औचित्य साधून आज बारामतीचे माजी उपनगराध्यक्ष भारत दादा अहिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली व शेरसुहास मित्र मंडळाचे शुभम अहिवळे यांच्या नेतृत्वाखाली तरुणींच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकाणी मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन करून स्त्री मुक्ती दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी सेजल अहिवळे,काजल अहिवळे,सारिका गव्हाळे,सौरवी अहिवळे,प्रेरणा अहिवळे,राजश्री अहिवळे या तरुणींच्या हस्ते मनुस्मृती चे दहन करण्यात आले.
या वेळी बा.न.प चे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते अनिल मोरे,राजेश पडकर,प्रशांत लांडे,विशाल घोडके,मुकेश अहिवळे,रितेश गायकवाड,राहुल सोनवणे,प्रफुल्ल राठोड,पप्पू माने,सुनिल चव्हाण,रोहित वाघमोडे,सागर गायकवाड,अक्षय शिंदे,रणजित मोरे,हनुमंत शिंदे यांच्यासह आदी अनुयायी उपस्थित होते.