बारामतीत मोठी खळबळ दोन ठिकाणी केंद्रीय यंत्रणांच्या पथकांनी छापे?
दौंड शुगर, अंबालिका शुगर्स, जरंडेश्वर साखर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

बारामतीत मोठी खळबळ दोन ठिकाणी केंद्रीय यंत्रणांच्या पथकांनी छापे?
दौंड शुगर, अंबालिका शुगर्स, जरंडेश्वर साखर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
बारामती वार्तापत्र
बारामतीत दोन ठिकाणी केंद्रीय यंत्रणांच्या पथकांनी आज, गुरुवारी सकाळीच शोधमोहिम सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित अधिका-यांची भेटही होऊ न शकल्याने नेमकी ही शोधमोहिम कशासाठी सुरु आहे हेही निष्पन्न झालेले नाही. एका खासगी साखर कारखान्याशी संबंधित एका पदाधिका-याच्या घराबाहेरही हे अधिकारी ठाण मांडून असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असले तरी या बाबत नेमका खुलासा झालेला नाही.
पॉवरफुल्ल नेत्याच्या निकटवर्तीयाची पथकाकडून चौकशी
उपलब्ध माहितीनुसार राज्यातील एका पॉवरफुल्ल नेत्याच्या नगर जिल्ह्यातील एका खासगी कारखान्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या निकटवर्तीयाची या पथकाकडून चौकशी केली जात आहे. काटेवाडीत हा निकटवर्तीय राहतो. दुसरीकडे बारामती एमआयडीसीतील एका आंतरराष्ट्रीय कंपनीत एक पथक पोहोचले आहे. त्यांच्याकडून कंपनीत तपासणी केली जात आहे.
ज्या साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाची छापेमारी होत आहे ते सर्वजण हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे इन्कम टॅक्स विभागाकडून सुरू असलेल्या या कारवाईमुळे थेट अजित पवार यांना धक्का असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान ही ईडीची धाड आहे की केंद्रीय तपास यंत्रणेची धाड आहे यासंदर्भात अधिक सविस्तर माहिती मिळाली नाही. परंतु बारामतीतील औद्योगिक वसाहतीतील दुध प्रकल्प आणि काटेवाडी या दोन ठिकाणी सकाळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सीआरपीएफचे जवान सुद्धा पोचले असल्याची माहिती समोर येत आहे.
त्यांनी नक्की काय चौकशी केली किंवा कशासाठी हे अधिकारी पोचले होते याची मात्र माहिती मिळू शकलेली नाही.
बारामतीतील औद्योगिक वसाहतीतील या उद्योगाची चौकशी करण्याचे कारण काय याचीही माहिती मिळाली नसून याठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणांची काही वाहने मात्र पोचलेली आहेत. बारामतीत अचानक आलेल्या या अधिकाऱ्यांमुळे मोठी खळबळ उडाली. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काटेवाडीतही एका साखर कारखान्याच्या संबंधित पदाधिकाऱ्याची चौकशी केली असल्याची माहिती मिळत आहे. मात्र याला अद्याप कोणीही दुजोरा दिलेला नाही.
पोलिसांनाही या छापेमारीबाबत फारशी कल्पना नसल्याचे पुढे आले आहे. बारामतीत काल किरीट सोमय्या येऊन गेल्यानंतर आज लगेचच छापेमारी सुरु झाल्यानंतर याला काही राजकीय संदर्भ आहेत किंवा कसे या बाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.