बारामतीत रक्तदानाचा गोरख धंदा.
बारामती ( वार्ताहर ) नियमानुसार आमिष दाखवून रक्तदान करणे हा कायद्याने गुन्हा असाताना मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीत हा गुन्हा होतोय पुन्हा – पुन्हा.
तर या पूर्वी आणि आत्ता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती परिसरात आणि इंदापूर परिसरात अनेकदा पाण्याचे जार, पेनड्राईव्ह, हेल्मेट, जेवणाचा डबा अश्या किंवा आर्थिक निकषाने लागेबांधे करून रक्तदानासारख्या पवित्र कार्यात अमिषाचे बाळकडू वाढताना दिसत आहे.
अशी माहीती इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँकेचे सचिव डॉ अशोक दोशी यांनी दिली त्याचा हा व्हिडीओ ….
जरी आमिष दाखवून रक्तदान करणे गुन्हा असला तरी आयोजकांकडून किंवा ब्लड बँकेकडून या नियमाची पायमल्ली होताना दिसत आहे.
बारामती आणि इंदापूर परिसरात अनेकदा मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे आयोजित केली जात आहेत मात्र हे रक्तदान स्थानिक ब्लड बँकेत आयोजित न करता पुणे, सातारा आणि बार्शी या ठिकाणच्या ब्लड बँकेशी हात मिळवणी करून आयोजित केले जात आहेत. कारण आयोजकाला आमिषाचे भुरळ पडलेले आहे. आणि या अमिषाला रक्तदाते बळी पडताना दिसत आहेत.
मात्र हे झालेले रक्तदान शिबीर स्थानिक ब्लड बँकेत न झाल्याने ते रक्त पुणे, सातारा, बार्शी या ठिकाणी जाते आणि ज्या ठिकाणी अशी रक्तदान शिबिरे होतात त्या ठिकाणी रक्ताचा तुटवडा निर्माण होतो त्यामुळे स्थानिक नागरिकांना जेव्हा एखादा अपघात किंवा रक्ताची तातडीची गरज असते तेव्हा मात्र स्थानिक ब्लड बँकेत योग्य वेळी रक्त उपलब्ध होत नाही ही मोठी शोकांतिका आहे.
या संदर्भात काही नागरिकांकडून उठाव केला जाणार असुन राज्य रक्त संक्रमण परिषद आणि अन्न व औषध प्रशासन यांना तक्रारी दिल्याचे देखील दिल्याचे समोर आले आहे.
सबब त्या आमिष दाखवून रक्तदान करणाऱ्या ब्लड बँकेचा आणि आयोजाकंचा आम्ही लवकरच पुढच्या बातमीत पर्दा फाश करणार आहोत.