आपला जिल्हा

बारामतीत तालुक्यातील भोंडवेवाडी येथे राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई.

६२ लाख ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

बारामतीत तालुक्यातील भोंडवेवाडी येथे राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई.

६२ लाख ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

बारामती- बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी येथे राज्य उत्पादन शुल्क पथकाने छापा टाकून तब्बल ६२ लाख ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सुख नाम दिलज्योत सिंग (वय.५६ रा. कोटदाना,ता.तरण तारन.जि. तरण तारन), (रा कोठडी,ता. पुखराज टीकमजी भार्गव दिसोरी.जि,पाली.राजस्थान, सध्या राहणार कुतवळ वस्ती,ता. बारामती) या आरोपींविरुद्ध विविध  कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटनेची हकीकत अशी की, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक २ पुणेचे निरीक्षक यांना बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी येथील रंगीला राजस्थान ढाब्याच्या आवारात टँकर लावून वाहन चालक आरोपी सुखनाम सिंग हा टँकर मधील अतिशुद्ध मद्यार्क चोरून ढाबा चालक भार्गव यास विक्री करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सदर ठिकाणी छापा टाकून भरारी पथकाने १६ चाकी टँकर क्र ( एम.पी ०९ एच.जे ०२७७ ) सह सुमारे चाळीस हजार लिटर अतिशुद्ध मद्यार्क ( स्पिरिट) प्लॅस्टिक कॅन, पाईप असा एकूण तब्बल ६२ लाख ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

टाळेबंदीच्या काळातील भरारी पथकाकडून केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. सदरची कारवाई प्रसाद सुर्वे, विभागीय भरारी उप-आयुक्त, संतोष झगडे अधीक्षक, संजय जाधव, संजय पाटील उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल बिराजदार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन पुणे, विजय मनाळे निरीक्षक दौंड विभाग, विकास थोरात दुय्यम निरीक्षक, सतीश इंगळे, प्रशांत दांंहिजे, सर्वश्री पडवळ, बी.आर.सावंत, विजय विंचुरकर, अशोक पाटील, मनिषा भोसले, केशव वामणे, अभिजीत रिसोलेकर यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!