बारामतीत रावसाहेब दानवे यांच्या विरोधात आंदोलन
शिवसेनेच्या वतीने आंदोलन
बारामती वार्तापत्र
दिल्लीमध्ये कृषी कायद्याच्या विरोधात असलेले शेतकरी आंदोलन सर्व शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय असताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना पाकिस्तान व चीनमधून सहकार्य मिळत असल्याचे केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनं करण्यात आली त्याप्रमाणे शिवसेनेच्या बारामती तालुका व शहर यांचे वतीने जिल्हाप्रमुख अँड राजेंद्र भाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली भिगवण चौकात इंधन दरवाढीच्या विरोधात व शेतकरी आंदोलना बाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या रावसाहेब दानवे यांचे विरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख अँड राजेंद्र काळे ,उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे ,तालुका प्रमुख विश्वास मांढरे ,शहर प्रमुख पप्पू माने, वाहतूक सेनेचे राजेंद्र पिंगळे, क्षेत्र प्रमुख निलेश मदने, महिला आघाडी सुमित खोमणे ,संगीता पोमने, युवा सेनेचे निखिल देवकाते ,गणेश कारंजे, सुदाम गायकवाड ,अँड अजित जगताप, रंगा निकम ,रमेश खलाटे, राजेंद्र साळुंके ,दत्ता लोणकर, बाळासो भापकर ,पप्पू काटे, सतीश गावडे, दादा दळवी ,संतोष सातपुते ,कल्याण जाधव ,राजेंद्र गलांडे यांच्यासह शिवसेनीक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.