बारामतीत लाच घेताना हवालदारासह होमगार्ड; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
८०० रुपयांवर तडतोड
बारामतीत लाच घेताना हवालदारासह होमगार्ड; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
८०० रुपयांवर तडतोड
क्राईम;बारामती वार्तापत्र
बारामती शहर पोलिस ठाण्यातील हवालदारासह होमगार्ड एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.
वॉरंटमध्ये तक्रारदाराला अटक न करण्यासाठी एक हजारांची लाच घेणं बारामती शहर पोलिस ठाण्यातील हवालदार आणि होमगार्डला चांगलंच महागात पडलंय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत एका हवालदारासह होमगार्डवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित व्यक्तीने याबाबत लाचलूचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. एक हजाराच्या लाचेच्या मागणीनंतर ८०० रुपयांवर तडतोड झाली होती. ५ व ६ मे रोजी एबीसीने या प्रकाराची पडताळणी केली होती. या पडताळणीत हवालदार आण्णासाहेब नामदेव उगले याने लाचेच्या मागणीस प्रोत्साहन दिले होते आणि होमगार्ड सनी गाढवे याने प्रत्यक्षात लाच मागितली होती हे तपासात उघड झाले. त्यानूसार सोमवारी ( दि. २३ ) रोजी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.