बारामतीत वाढत्या रुग्ण संख्येमुळे व्यापाऱ्यांचा सोमवारी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय
सर्वांनी सरकारने दिलेल्या कोव्हिडं 19 च्या सर्व नियमांचे पालन करावे.

बारामतीत वाढत्या रुग्ण संख्येमुळे व्यापाऱ्यांचा सोमवारी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय
सर्वांनी सरकारने दिलेल्या कोव्हिडं 19 च्या सर्व नियमांचे पालन करावे.
बारामती वार्तापत्र
मागील काही दिवसांपासून बारामतीत वाढत असलेले करोना रुग्ण संख्या बघता आपण सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
त्या पार्श्वभूमीवर , सोमवार दिनांक 12 एप्रिल 2021 रोजी पुढील निर्णय येसतोपर्यंत सर्व व्यापाऱ्यांनी आप आपली दुकाने बंद ठेवावी.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या अत्यावश्यक सेवा खेरीज इतर निर्बंधांचा विरोध करत महाराष्ट्रातील व्यापारी संघटनांनी सोमवारपासून दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला होता. तसाच निर्णय बारामतीत देखील व्यापारी महासंघाने घेतला होता. अध्यक्ष नरेंद्र गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता, परंतु आज संध्याकाळी तातडीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
अर्थात अत्यावश्यक सेवा सरकारने ज्या लागू केल्या आहेत त्या मात्र चालू राहतील. राज्य सरकारने ज्या अत्यावश्यक सेवा लागू केलेल्या आहेत, त्या किराणा डेअरी बेकरी तसेच परिपत्रकात लागू केलेल्या सर्व अत्यावश्यक सेवा मात्र बारामतीत चालू राहणार आहेत. असे या सूत्रांनी सांगितले.