बारामतीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन दिले जातेय शिक्षण.
ऑनलाईन व्हिडीओ कॉलिंग (झूम ॲप) द्वारे संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्यासाठी येथील विनोद कुमार गुजर शाळा पुढे सरसावली आहे.

बारामतीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन दिले जातेय शिक्षण.
बारामती- संपूर्ण भारत भरात टाळेबंदी सुरू आहे. राज्यात टाळेबंदीसह संचारबंदी लागू आहे.यामुळे शाळा-कॉलेज,क्लासेस, सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश लागू आहेत.याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याचा विचार करून बारामतीतील विनोदकुमार गुजर स्कूल मध्ये ऑनलाईन व्हिडीओ कॉलिंग( झूम ॲप) द्वारे मुलांना घर बसल्या सर्व अभ्यासक्रम देण्याचा उपक्रम आजपासून सुरू केला आहे.
देशभरात विविध कारणांनी बारामतीला ओळखले जाते. तसेच पुण्यापाठोपाठ आता शैक्षणिक क्षेत्रात बारामती अग्रेसर ठरत आहे. शैक्षणिक दृष्ट्या सजग असणाऱ्या बारामतीत टाळेबंदी दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन व्हिडीओ कॉलिंग (झूम ॲप) द्वारे संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्यासाठी येथील विनोद कुमार गुजर शाळा पुढे सरसावली आहे.
ऑनलाइन व्हिडिओ कॉलिंगद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवला जात आहे. अध्यापना दरम्यान विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास ती विचारण्याची व तिचे निरसन करण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच एखाद्या विद्यार्थी काही कारणास्तव उपस्थित राहू शकला नाही. तरी त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अभ्यासक्रमाच्या प्रत्येक तासाचे व्हिडीओ चित्रीकरण लिंकद्वारे त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले जाऊन तो अभ्यासक्रम त्या विद्यार्थ्याला पुन्हा शिकता येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असणाऱ्या टाळेबंदी व संचारबंदीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. आता ऑनलाइन व्हिडीओ कॉलिंग द्वारे अभ्यासक्रम घरबसल्या शिकता येऊ लागल्याने पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.