बारामतीत शारदा प्रांगण च्या आवारात लसीकरण केंद्र सुरू, आरोग्य विभाग व नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने झाला सुरू
लसीकरणानंतर काही काळ नागरिकांना निरिक्षणाखाली ठेवले जात होते

बारामतीत शारदा प्रांगण च्या आवारात लसीकरण केंद्र सुरू, आरोग्य विभाग व नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने झाला सुरू
लसीकरणानंतर काही काळ नागरिकांना निरिक्षणाखाली ठेवले जात होते
बारामती वार्तापत्र
शहरातील नगरपालिकेसमोरील शारदा प्रांगणातील शाळेमध्ये आजपासून कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरु झाल्याने बारामतीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय, आरोग्य विभाग व बारामती नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे.
आजपासून हे लसीकरण सुरु झाले. शारदा प्रांगण बारामती शहराला मध्यवर्ती असल्याने अनेक लोक येथे येऊन लसीकरण करताना पहिल्याच दिवशी दिसले. या ठिकाणी सर्व यंत्रणा उपलब्ध असून लसीकरणानंतर काही काळ नागरिकांना निरिक्षणाखाली ठेवले जात होते, या शिवाय त्यांना गोळ्याही दिल्या जात आहेत.
या ठिकाणी ऑनलाईन पध्दतीने नोंदणीची सुविधा देण्यात आली असून डॉक्टर, परिचारिका व इतर सहकारी लसीकरण वेगाने करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे,नगराध्यक्षा पौर्णिमाताई तावरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी या लसीकरण केंद्रास भेट दिली. उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, किरण गुजर, सुधीर पानसरे, अभिजीत चव्हाण,नगरसेविका मयुरी शिंदे ,अनघा जगताप आदींनी व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली.