बारामतीत शिवसेनेच्या वतीने नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडो मारो आंदोलन…
कमळाबाईचा सूक्ष्म बुद्धीचा नारू हा बॅनर ठरला चर्चेचा विषय...

बारामतीत शिवसेनेच्या वतीने नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडो मारो आंदोलन…
कमळाबाईचा सूक्ष्म बुद्धीचा नारू हा बॅनर ठरला चर्चेचा विषय…
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अपशब्द वापरल्यामुळे तमाम शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून,नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले असून,बारामतीत देखील नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडो मारो आंदोलन करण्यात आले.कोंबड्या फेकत राणेंचा जाहीर निषेध करण्यात आला.
नारायण राणे हे महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करीत असल्यामुळे महाराष्ट्रातील जनजीवन धोक्यात आले असल्याचा आरोप शिवसेनेचे पुणे जिल्ह्याचे समन्वयक राजेंद्र काळे यांनी केला.नारायण राणे च करायचं काय खाली मुंड वर पाय अशा घोषणा देत जाहीर निषेध करण्यात आला.नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांना देखील संपवण्याची भाषा वापरली असून अशा माजलेल्या नेत्यांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला पोलीस प्रशासनाने त्वरित अटक करावी अशा मागणीचे निवेदन शिवसैनिकांकडून पोलीस प्रशासनाला देण्यात आले