बारामतीत सावित्रीमाई फुलेंची जयंती उत्साहात साजरी
प्रेरणादायी विचार हे आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक

बारामतीत सावित्रीमाई फुलेंची जयंती उत्साहात साजरी
प्रेरणादायी विचार हे आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक
बारामती वार्तापत्र
येथील शेरसुहास मित्र मंडळाच्यावतीने भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका,क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास उपस्थित महिलांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.
यावेळी ॲड.निलम अहिवळे,प्रा.सेजल अहिवळे,प्रा.अस्मिता शिंदे,शुभम अहिवळे,अक्षय माने,किरण भोसले यांनी आपले विचार व्यक्त करत असताना सावित्रीमाईंचा धगधगता आणि संघर्षमय प्रवास सांगून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला.
याप्रसंगी,पुजा लोंढे,रसिका अहिवळे,सौरवी अहिवळे,गौतम शिंदे,सिद्धार्थ लोंढे,भारत सोनवणे,रितेश गायकवाड,सुमित मोहिते,रोहित वाघमोडे,सनी यादव,गणेश तावरे,दत्ता बिबे,युवराज खिराडे,राहुल काळे,मयूर केंगार,अजय माने आदी उपस्थित होते.