बारामतीत होणार आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन !
बारामती स्पोर्ट च्या वतीने होणार आयोजन
बारामती वार्तापत्र
बारामतीत नोव्हेंबर पासून आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे. बारामती स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सतीश ननवरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली यावेळी कारभारी फाऊंडेशनचे सचिव प्रशांत नाना सातव हे उपस्थित होते.
बारामती राजकीय राजधानी म्हणून ओळखली जाते मात्र या बरोबरच खेळाची पंढरी म्हणून आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन च्या माध्यमातून बारामतीची ओळख जावी व युवकांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण व्हावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे
या मॅरेथॉनमध्ये केनिया, इथिओपिया, युरोप याचबरोबर अन्य देश सहभागी होणार आहेत तसेच राष्ट्रीय व राज्य पातळीवर खेळणारे खेळाडूही यामध्ये सहभागी होतील. महाविद्यालयीन युवकांसाठी दहा किमी ची मॅराथॉन व्यवसायिक खेळाडूंसाठी 21 किमी ची हाफ मॅरेथॉन व इतर स्पर्धकांसाठी 42 किमीची पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे
यामध्ये राष्ट्रीय खेळाडूंसाठी व परदेशी खेळाडूंसाठी स्वतंत्र विभाग करून त्यांना परितोषीके दिली जाणार आहेत. त्याचबरोबर आजपर्यंत कधीच मॅरेथॉनमध्ये सहभाग न घेतलेल्या नागरिकांसाठी तीन किमी ची फन- रन होणार असल्याचे सतीश ननावरे यांनी सांगितले
या मॅरेथॉन साठी खेळाडूंचा सराव घेतला जाणार आहे स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक खेळाडूला पदक दिले जाईल.
प्रजासत्ताक दिना दिवशी बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार व बारामती सहकारी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष रणजित पवार यांच्या उपस्थितीत या मॅरेथॉनची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. या मॅरेथॉनसाठी सर्व खेळाडूंना विनामूल्य मार्गदर्शन बारामती स्पोर्ट्स फाउंडेशन च्या वतीने विनामूल्य केले जाणार आहे.