बारामतीमध्ये आज पुन्हा 12 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह.
२२ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
बारामतीमध्ये आज पुन्हा 12 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह.
बारामतीमध्ये आज पुन्हा ८२ नमुन्यांपैकी १२ जणांचे अववाल पाॅझिटिव्ह आले आहे तर २२ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
काल रात्री पंधरे येथील एका रुग्णाचा मृत्यू झालेला होता त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आलेला आहे. तर मृत्यूंची संख्या 18 झालेली आहे
बारामती वार्तापत्र
आज सकाळी बारामती तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कातील संशयीत असणाऱ्या तब्बल 44 जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले होते,त्यामुळे काही प्रमाणात बारामतीकरांसाठी दिलासादायक बातमी होती.
वसंतनगर पुरुष 21, बस स्टँड पुरुष 29 ,बस स्टँड स्त्री 49 , आयएस एमटी ,कंपनी पुरुष 34,पणदरे पुरुष 32 ,अमराई स्त्री 54 ,शिरसुफळ 35 स्त्री
,जगताप मळा 52 ,भोई गल्ली 18 पुरुष, वंजार वाडी पुरुष 49 ,तांदुळवाडी स्त्री 36, शिर्सूफळ पुरुष 45
परंतु आत्ता आलेल्या अहवालानुसार आज पुन्हा 12 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बारामतीकरांची डोखेदुखी वाढल्याचे चित्र असून नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.
बारामतीची एकूण रुग्ण संख्या 267 झालेली आहे.