पाहुणेवाडी ग्रामपंचायत सरपंच पदी जयकुमार तावरे व उपसरपंच पदी राधिका भंडलकर यांची निवड.
सरपंच निवडणूक वेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता

पाहुणेवाडी ग्रामपंचायत सरपंच पदी जयकुमार तावरे व उपसरपंच पदी राधिका भंडलकर यांची निवड.
सरपंच निवडणूक वेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता
बारामती वार्तापत्र
पाहुणेवाडी ता.बारामती ग्रामपंचायत सरपंच पदी जयकुमार भगवान तावरे व उपसरपंच पदी राधिका महादेव भंडलकर यांची निवड करण्यात आली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बारामती तालुका कृषी सहायक अधिकारी सचिन फुले यांनी काम पाहिले.उज्वला केशव तावरे , दादा जगताप, सचिन मारुती तावरे, आशा यादव , सचिन बुरुंगले ,साधना परकाळे, विभावरी यादव हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
यावेळी पाहुणेवाडी गावचे ग्रामसेवक कांतीलाल कांळणे तलाठी लोखंडे मॅडम उपस्थित होते. सरपंच निवडणूक वेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार ग्रामस्थांनाच्या वतीने करणयात आला.याप्रसंगी माजी सरपंच भगवान तावरे, पिनू पाटील , उद्योजक अरविंद जराड, सामजिक कार्यकर्ते दीपक सरोदे, विठ्ठल चव्हाण , शहाजी भिसे, कल्याण कदम, पनीकु जाधव, राजेंद्र ताकवले,उमेश परकाळे,चंदू नाळे,तुषार चव्हाण,स्वप्नील यादव,संदीप इंगळे,धीरज तावरे उपस्थित होते.