बारामतीमध्ये कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या सहा गायींची सुटका ,तिघांविरोधात गुन्हा दाखल.
तालुका पोलिस ठाण्यात कर्मचारी अमोल नरुटे यांनी याबाबत फिर्याद दिली.

बारामतीमध्ये कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या सहा गायींची सुटका ,तिघांविरोधात गुन्हा दाखल.
तालुका पोलिस ठाण्यात कर्मचारी अमोल नरुटे यांनी याबाबत फिर्याद दिली. .
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपालिका हद्दीत तादूळवाडी भागात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या सहा गायींची सुटका करण्यात आली. गोसंवर्धनासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे या गायींचे प्राण वाचविण्यात आल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी तिघांविरोधात महाराष्ट्र प्राणीरक्षण अधिनियम व पशुक्ररता अधिनियमानुसार बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मोहसीन मोहम्मदशरीफ कुरेशी (रा.खाटीकगल्ली, बारामती), आसिफ कुरेशी (पूर्ण नाव नाही,रा.म्हाडा काॅलनी, बारामती) व टेम्पोचालक गुलाब शेख (रा.आसू,ता.फलटण,जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
तालुका पोलिस ठाण्यात कर्मचारी अमोल नरुटे यांनी याबाबत फिर्याद दिली. राज्य शासनाचे मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी व हर्षद देवकाते यांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांना ही माहिती दिली.
ढवाण यांनी तात्काळ कर्मचाऱयांना कारवाही चे आदेश दिले. पोलिस कर्मचारी विमानतळ रस्त्याने डेरेवस्ती येथे गेले असता आयशर टेम्पो (एमएच-१३, एएक्स-२४०३) उभा होता. त्यात पाच गायी भरण्यात आल्या होत्या. त्यांचे हातपाय रस्सीने बांधण्यात आले होते. चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. पोलिसांनी जनावरांचे फोटो काढून विचारणा केली असता य तिघांी नावे समजली. त्यांनी ही जनावरे कत्तलीसाठी अकलूज (जि. सोलापूर) येथे नेत असल्याचे सांगितले.