बारामतीमध्ये काल १९ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३९४६ वर गेली आहे.
बारामतीमध्ये काल १९ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३९४६ वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (२०\१०\२०२०) एकूण rt-pcr नमुने ७६. एकूण पॉझिटिव्ह- ११. प्रतीक्षेत ००. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -०१. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -१२ त्यापैकी पॉझिटिव्ह -०१. कालचे एकूण एंटीजन ५८ . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-०७ . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ११+०१+०७=१९. शहर-०७ . ग्रामीण- १२. एकूण रूग्णसंख्या-३९४६ एकूण बरे झालेले रुग्ण- ३७३८ एकूण मृत्यू– १०८.
आरटीपीसीआर तपासणीत आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये निरावागज येथील ५५ वर्षीय महिला, ३४ वर्षीय पुरूष, सस्तेवाडी येथील २२ वर्षीय महिला, मासाळवाडी येथील २९ वर्षीय पुरूष, सांगवी येथील ३२ वर्षीय पुरूष, तांदूळाडी येथील ४५ वर्षीय महिला, मेडद येथील २८ वर्षीय पुरूष, २७ वर्षीय महिला, फातिमानगर येथील २० वर्षीय युवक, रुई येथील ५० वर्षीय पुरूष, खताळपट्टा येथील २६ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील रॅपीड अॅंटिजेन तपासणीत सायली हिल येथील ४२ वर्षीय पुरूष, बारामतीतील ५१ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील गिरीजा लॅबोरेटरी येथे तपासलेल्या नमुन्यात कऱ्हावागज येथील ८१ वर्षीय पुरूष रुग्णास कोरोनाची लागण झाली आहे.
बारामतीतील मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपीड अॅंटिजेन तपासणीत तांबेनगर येथील ७४ वर्षीय पुरूष, शिवनगर माळेगाव येथील ६२ वर्षीय पुरूष तर बांदलवाडी येथील ३८ वर्षीय पुरूष रुग्णास कोरोनाची बाधा झाली आहे.