बारामतीमध्ये काल ४१ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३६०८ वर गेली आहे.
बारामतीमध्ये काल ४१ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
काल देखील दोन जणांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तालुक्यातील कोरोनाबळींची संख्या ९४ झाली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (७\१०\२०२०) एकूण rt-pcr नमुने १४४. एकूण पॉझिटिव्ह- १५. प्रतीक्षेत ००. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -०२. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -२१ त्यापैकी पॉझिटिव्ह -०६ कालचे एकूण एंटीजन ७१. एकूण पॉझिटिव्ह-२० . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १५+०६+२०=४१. शहर-१८ . ग्रामीण- २३. एकूण रूग्णसंख्या-३६०९ एकूण बरे झालेले रुग्ण-३०३८ एकूण मृत्यू– ९४.
बारामतीच्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीत खताळपट्टा येथील २५ वर्षीय पुरूष, बारामती शहरातील ६५ वर्षीय महिला, नवरंग बोहरी चाळ येथील २७ वर्षीय पुरूष, रुई येथील ३९ वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
बारामतीतील शासकीय रॅपीड अॅंटीजेन तपासणीत बारामती शहरातील २९ वर्षीय पुरूष, तादूळवाडी येथील ३८ वर्षीय महिला, वाणेवाडी येथील २५ वर्षीय पुरूष, ६१ वर्षीय पुरूष, जळोची येथील ४६ वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील २२ वर्षीय पुरूष, मोरेवाडी येथील ३५ वर्षीय पुरूष, जळोची येथील ३८ वर्षीय पुरूष, रुई येथील ४८ वर्षीय पुरूष, मळद येथील ३० वर्षीय पुरूष, खताळपट्टा येथील १८ वर्षीय मुलगी, बारामती शहरातील ३२ वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
बारामतीच्या मंगल लॅबोरेटरीमध्ये तपासलेल्या नमुन्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये वाघळवाडी येथील २१ वर्षीय युवक, पाहुणेवाडी येथील ३५ वर्षीय पुरूष, कोऱ्हाळे येथील ४२ वर्षीय पुरूष, आनंदनगर भिगवण रोड येथील ७४ वर्षीय पुरूष, व्हिल कॉलनी येथील ६४ वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
बारामतीतील खासगी गिरीजा प्रयोगशाळेत तपासलेल्या नमुन्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये खांडज येथील २८ वर्षीय पुरूष, ३५ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील पवार लॅबोरेटरीमध्ये तपासणी केलेल्या रॅट नमुन्यामध्ये माळेगाव येथील नागेश्वरनगर येथील ३५ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आली आहे.
इंदापूर तालुक्यातील दोन जण कोरोनाबाधित
बारामतीतील तपासणीत इंदापूर तालुक्यातील लाकडी येथील २८ वर्षीय पुरूष व तावशी येथील पुरूष कोरोनाबाधित आढळून आले आहेत.