बारामतीमध्ये काल 46 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4750 वर गेली आहे.
बारामतीमध्ये काल 46 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4750 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (24/11/20) एकूण rt-pcr नमुने 357. एकूण पॉझिटिव्ह-16 . प्रतीक्षेत 59. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -05. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -18 त्यापैकी पॉझिटिव्ह -11. कालचे एकूण एंटीजन 146 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-19 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 16+11+19=46. शहर-30 . ग्रामीण- 16. एकूण रूग्णसंख्या-4750 एकूण बरे झालेले रुग्ण- 4362 एकूण मृत्यू– 124.
शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये मोतीबाग येथील 65 वर्षीय पुरुष, अवचट इस्टेट येथील 80 वर्षीय पुरुष, कसबा येथील वीस वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 56 वर्षीय पुरुष, संघवीनगर येथील 37 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय पुरुष, कऱ्हावागज येथील 23 वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 61 वर्षीय महिला, मुरूम येथील 38 वर्षीय महिला, सहयोग सोसायटी येथील 56 वर्षीय पुरुष, सोमेश्वरनगर येथील 22 वर्षीय पुरुष, जळोची येथील 65 वर्षीय पुरुष, तांबे नगर येथील 63 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
काल झालेल्या शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये जळोची येथील 29 वर्षीय पुरुष, सोमेश्वर नगर येथील 45 वर्षीय पुरुष, गोजुबावी येथील 19 वर्षीय महिला, 47 वर्षीय पुरुष, मेडद येथील 25 वर्षीय पुरुष, नगर येथील 42 वर्षीय पुरुष, गुणवडी येथील 59 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सोनाई हाइट्स अभिमन्यू कॉर्नर एमआयडीसी येथील 41 वर्षीय महिला, कोंडाई अपार्टमेंट येथील 37 वर्षीय महिला, अशोकनगर येथील 43 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
गिरिजा लॅबोरेटरी येथे आढळलेल्या कोरोनाग्रस्त मध्ये मळद येथील 31 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे.
पवार लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅट तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये अर्बन व्हिलेज सोसायटी फलटण रोड येथील 38 वर्षीय पुरुष, सस्तेवाडी पाटील वाडा होळ येथील 71 वर्षीय पुरुष, सावंतवाडी येथील 37 वर्षीय महिला, एमआयडीसी येथील 27 वर्षीय महिला, आपले घर सोसायटी तांदूळवाडी येथील 29 वर्षीय पुरुष या रुग्णांचा समावेश आहे.
बारामतीतील नागरिकांना आवाहन करण्यात येते की सध्या थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत व कोरोणाचे रुग्ण हळूहळू वाढू लागले आहेत त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मास्क व सॅनिटायझरचा वापर व सोशल डिस्टंसींग पाळणे अत्यंत आवश्यक आहे, नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजार असलेल्या नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे व कोरोना पासून स्वतःच बचाव करावा